Tuesday, March 24, 2026

Latest Posts

मुंबईच्या प्रसिद्ध ज्वेलरी मेकर अश्विनी करकरे देणार महिलांना कौशल विकास प्रशिक्षण इन्फिगो फाउंडेशन कडून रत्नागिरीत पुन्हा एकदा ज्वेलरी प्रशिक्षनाचे आयोजन

रत्नागिरी:आजकाल विविध प्रकारची ज्वेलरी बाजारात उपलब्ध आहे. मुली महिलांना अशी आकर्षक ज्वेलरी फार आवडते. अनेकींना अशी आधुनिक ज्वेलरी स्वतः करायची इच्छा असते. तर काहींना येत असली तरी विविध डिझाईन्स मिळाली तर हवी असतात. पण आपल्या आजूबाजूला पटकन असे काही उपलब्ध होतेच असे नाही. हाच मुद्दा विचारात घेऊन इन्फिगो फाउंडेशने सामाजिक जाणिवेतून व महिलांनी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वावलंबी व्हावे याकरिता आपल्या रत्नागिरीमध्ये आधुनिक ज्वेलरी मेकिंगचे कौशल्य प्रशिक्षण शहरी व ग्रामीण भागातील महिलांसाठी खास आयोजित केले आहे. 

मुंबईच्या सुप्रसिद्ध डिझाईन व ज्वेलरी मेकर सौ. अश्विनी करकरे या प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. हे प्रशिक्षण इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल, साळवी स्टाॅप, रत्नागिरी येथे होणार आहे. यामध्ये लागणारे विशेष प्रकारचे साहित्य इन्फिगो फाउंडेशनतर्फे देण्यात येणार आहे. याशिवाय स्वतः तयार केलेला बांगड्या, हार व कानातले असा सेट प्रत्येकीला मिळणार आहे, तो ही मोफत.

मागील महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाला 200 महिलांनी सहभाग घेतला आणि उत्तम प्रतिसाद दिला व त्यांनी केलेल्या मागणी नुसार अजून ऍडव्हान्स शिकायची इच्छा वक्त्य केली म्हणून आता आपण घेऊन येत आहोत बेसिक आणि ऍडव्हान्स असे 2 कोर्स कार्यशाळेची योजना तयार करण्यात आली आहे. तरी या  ऍडव्हान्स कोर्स मध्ये केवळ ७० आणि बेसिक मध्ये फक्त ८० महिलांना प्रवेश दिला जाईल तरी या कार्यक्रमाला पण उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा इन्फिगो फॉउंडेशनची आहे
प्रशिक्षणाचे वेळापत्रक: 
     बेसिक कोर्स: 
  – ११ एप्रिल २०२५, वेळ: १:०० ते ३:३० किंवा ४:३० ते ७:००
    ऍडव्हान्स  कोर्स:
  – १२ एप्रिल २०२५, वेळ: १०:०० ते १२:३० किंवा २:३० ते ५:००

तरी सहभागासाठी आजच *9021502206* या नंबरवर आपले नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करा. ऍडव्हान्स कोर्स करिता रु. 200/- व बेसिक करिता रु.100/-तरी इच्छुकाचे नाव, पत्ता व फोन नंबर वरील व्हाट्सअँप नंबरवर पाठवून आपली नोंदणी पूर्ण करा. प्रशिक्षणासाठी जागा मर्यादित आहेत. नोंदणी करणाऱ्यांना कार्यक्रमाविषयी अधिक तपशील वैयक्तिक कळविण्यात येईल. दिनांक २ एप्रिल २०२५ अखेर पर्यंत नोंदणी मुदत आहे. त्यामुळे अधिकाधिक महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे इन्फिगो फाउंडेशनतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.