Saturday, March 21, 2026

Latest Posts

रत्नागिरी शहरातील सदोष सीसी टीव्ही कॅमेरा यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करा : रत्नागिरी मनसेची जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागणी

रत्नागिरी:  शहर तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्या, अप्रिय घटना  व अंतर्गत सुरक्षिततेच्या
रत्नागिरी शहर व सभोवतालच्या  परिसरातील वाढते शहरीकरण लक्षात घेता तसेच देशाच्या इतर भागांतून रेल्वे मार्फत होणारी येजा लक्षात घेता तसेच एकूणच शहरात होणारे स्थलांतर पाहता अंतर्गत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रत्नागिरी नगर परिषद आणि सभोवतालच्या परिसरातीतील ग्रामपंचायत  अंतर्गत येणाऱ्या सर्व गृहनिर्माण संस्था ( हौऊसिंग सोसायटी) तसेच खाजगी आस्थापने यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात यावे तसेच प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून रत्नागिरी शहरात कार्यान्वित केलेली सीसीटीव्ही यंत्रणा सदोष असून ती नादुरूस्त असून ती सक्षम ठेकेदाराकडून पुन्हा सुरु करण्यात यावी अशी मागणी अशी मागणी मनसे तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव यांच्या नेतृत्वात मनसे शिष्टमंडळाच्यावतीने मा. जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण यावर लवकरात कारवाई करू असे आश्वासन मा. पोलिस अधीक्षक श्री. नितीनजी बगाटे यांनी उपस्थित  मनसे पदाधिकाऱ्यांना दिले आहे. याप्रसंगी मा. जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देताना रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव, मनविसे जिल्हा अध्यक्ष श्री गुरूप्रसाद चव्हाण, शहर संघटक श्री अमोल श्रीनाथ, तालुका सचिव ॲड. अभिलाष पिलणकर , तालुका उपाध्यक्ष श्री. राजू पाचकुडे , श्री सौरभ पाटील, उप शहर अध्यक्ष श्री. राहुल खेडेकर, विभाग अध्यक्ष श्री. सोम पिलणकर, श्री. मुन्ना शेलार, श्री आकाश फुटक आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.