Saturday, March 21, 2026

Latest Posts

रत्नागिरीच्या देवांगची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

रत्नागिरी: १४ वर्षा खालील विभागीय शालेय लेदर बॉल स्पर्धा सरपंच क्रीडांगण नावेपरगाव,हातकणंगले, कोल्हापूर या ठिकाणी पार पडल्या.GGPS संघाने तालुकास्तर त्यानंतर जिल्हास्तरावर चांगली कामगिरी करत या स्पर्धेत विभागीय स्तरावर खेळण्याचा मान मिळवला,विभाग स्तरावर जी जी पी एस  संघाने , देवांग गुरव , आराध्य मोंडकर, रुद्र पांढरे यांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर  सांगली जिल्हा, कोल्हापूर म.न.पा. व फायनल ला सिंधुदुर्ग जिल्ह्याला हरवून नाशिक या ठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या  राज्यस्तरीय स्पर्धे साठी हा संघ रत्नागिरी जिल्ह्यातून प्रथमच सहभागी होण्यात यशस्वी ठरला ,विभाग स्तरावर सिंधुदुर्ग सोबत झालेल्या फायनल मध्ये देवांग याने 29 चेंडूत 15 चौकरासहित 69 धावा कुटल्या आणि फायनल एकतर्फी जिंकण्यात संघाला यश मिळाले. शाळेचे क्रीडा प्रशिक्षक श्री कदम सर यांचे मोलाचे मार्गदर्शन त्याला संपूर्ण स्पर्धेत मिळाले. राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिक विभागा सोबत झालेल्या सामन्यात हा संघ पराभूत झाला असला तरीही देवांग गुरव नाबाद 58 व आराध्य बांदिवडेकर 23 यांनी या सामन्यात चांगली कामगिरी केली. या संपूर्ण स्पर्धेतील अष्टपैलू कामगिरी च्या जोरावर देवांग गुरव याची नॅशनल गेम साठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.रत्नागिरीतील SOSA या क्रिकेट अकादमी मध्ये तो कोच शकील सर,केतन सावंत सर,साईप्रसाद सर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट चे प्रशिक्षण घेत आहे,या त्याच्या यशाबद्दल संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम.शिल्पाताई पटवर्धन , सचिव श्री सतीश जी शेवडे,श्री आनंद शेठ देसाई , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सोनाली पाटणकर , पर्वेक्षक श्री आकिवटे  , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक वृंद यांनी त्याचे अभिनंदन  केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.त्याचप्रमाणे पावस पंचक्रोशी आणि मावळंगे गाव , मित्र वर्ग,नातेवाईक यांचेकडून त्याच्या या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले जात आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.