Monday, March 23, 2026

Latest Posts

रत्नागिरीत प्रभाग 10 ची निवडणूक स्थगित

रत्नागिरी:- नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याप्रकरणात अपिलाचे निकाल उशिराने लागल्याने रत्नागिरी नगर पालिकेतील प्रभाग 10 ची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली आहे. ही निवडणूक आता 2 डिसेंबर ऐवजी 20 डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सुधारीत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.रत्नागिरी नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग दहामध्ये अपक्ष उमेदवार सचिन शिंदे व संपदा रसाळ-राणा यांचा उमेदवारी अर्ज हा प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाच्या रचनेनुसार नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला होता. त्याविरोधात दोन्ही उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात अपिल दाखल केली होती. हे अपिल जिल्हा न्यायालयात 24 नोव्हेंबर रोजी फेटाळण्यात आले होते.
त्यामुळे 23 नोव्हेंबर किंवा त्यानंतर आलेल्या निकालांमुळे या सदस्यपदांच्या निवडणुका 4 नोव्हेंबरच्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेऊ नयेत व ही निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रभाग 10 व्यतिरिक्त अन्य प्रभागांची निवडणूक यापूर्वी जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार घेण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रभाग 10 साठी त्यामुळे नवीन कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची तारीख 10 डिसेंबर दु.3 वाजेपर्यत आहे. आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह देऊन, अंतिम लढवणाऱ्या निवडणूक उमेदवारांची यादी 11 डिसेंबर रोजी प्रसिध्द करायची असून 20 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते 5.30पर्यत मतदान होणार आहे तर मतमोजणी 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. करायची आहे. 4 डिसेंबरपासून प्रभागापुरती आचारसंहिता लागू होणार आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.