रत्नागिरी : महाराष्ट्र पोलिस दलामध्ये केलेल्या उत्तम कामगिरी बद्दल रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या १५ पेालिस अधिकारी-अंमलदारांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह-2024 प्राप्त झाले आहे.
यामध्ये प्रवर्ग-१० यामध्ये विशेष सेवा करणारे रत्नागिरी पोलिस मुख्यालयातील पोलिस हवालदार नितीन डोळस यांचा समावेष आहे. तर प्रवर्ग-८ म्हणजे १५ वर्षे सेवा केल्याप्रकरणी रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, महामार्ग पोलिस मदत केंद्र कशेडीचे सहाय्यक पोलिस फौजदार सुधाकर रहाटे, महामार्ग पोलिस मदत केंद्र हातखंबा सहाय्यक पोलिस फौजदार संजय मुरकर, देवरुख पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस फौजदार दिपक पवार,रत्नागिरी शहर पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस फौजदार राजेंद्र सावंत,रत्नागिरी जिल्हा वाहतुक शाखेचे पोलिस हवालदार दिनेश आखाडे, महामार्ग पोलिस मदत केंद्र कशेडीचे पोलिस हवालदार विजय मोरे, पूर्णगड पोलिस स्थानकाचे पोलिस हवालदार प्रकाश झोरे, व महिला पोलिस हवालदार सोनाली शिंदे, अलोरे पोलिस स्थानकाचे पोलिस हवालदार दिपक ओतारी, जयगड पोलिस स्थानकाचे पोलिस हवालदार मिलिंद कदम, चिपळूण पोलिस स्थानकाचे पोलिस हवालदार प्रितेश शिंदे, दापोली पोलिस स्थानकाचे पोलिस हवालदार संतोष सडकर,पूर्णगड पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस फौजदार महेश सावंत पूर्णगड पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस फौजदार महेश मुरकर यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.











