रत्नागिरी : ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त लायन्स क्लब रत्नागिरीतर्फे आज भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. जयस्तंभ येथून रॅलीची सुरुवात होऊन सावरकर चौक येथे सांगता करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रारंभी जयस्तंभाला पुष्पचक्र अर्पण सहायक पोलिस निरीक्षक सतीश शिंदे व लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन संजय पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रॅली च्या मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.रॅलीच्या दरम्यान देशभक्तीपर घोषणा, “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “जय हिंद” अशा विविध घोषवाक्यांचा जयघोष शहराच्या गल्लीबोळांतून घुमत होता. हातात तिरंगा, अंगावर शाळेचा गणवेश आणि देशभक्तीने उजळलेले चेहरे पाहून उपस्थित नागरिकांमध्येही उत्साहाचे संचार झाले. विद्यार्थ्यांच्या टाळ्यांचा, पावलांचा आणि घोषणांचा ताल एकच देशभक्तीचा सूर निर्माण करत होता. रॅलीत सीक्रेड हार्ट कॉन्वेंट स्कूल, शिर्के हायस्कूल, नाईक हायस्कूल, देसाई हायस्कूल गोदुताई जांभेकर हायस्कूल पटवर्धन हायस्कूल व फाटक हायस्कूलच्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. उत्कृष्ट घोषवाक्य, उत्कृष्ट संचलन व उत्कृष्ट वेशभूषा या तीन गटांमध्ये विजेत्या शाळांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी लायन्स क्लब रत्नागिरीचे अध्यक्ष ला संजय पटवर्धन, सचिव ला शरद नागवेकर खजिनदार ला मनोज सावंत यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रॅलीतील दिलेल्या बक्षिसांचे परीक्षण परीक्षक म्हणून MJF ला डॉ. संतोष बेडेकर MJF Adv ला शबाना वस्ता MJF ला डॉ शिवानी पानवलकर ला डॉ सचिन पानवलकर आणि ला डॉ गणेश कुलकर्णी यांनी केले
ही रॅली यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष ला संजय पटवर्धन, सचिव ला शरद नागवेकर खजिनदार ला मनोज सावंत यांच्यासह MJF ला ओंकार फडके, MJF ला गणेश धुरी, PMJF ला प्रमोद खेडेकर, MJF ला पराग पानवलकर, MJF ला शिल्पा पानवलकर,MJF ला सुप्रिया बेडेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
तसेच या रॅली मध्ये वरील सर्व सदस्यासह, ला दत्तप्रसाद केळुसकर, ला बिपीन शहा,ला मेघना शहा, ला विशाल ढोकळे, ला अमेय वीरकर, ला स्नेहल नागवेकर आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांनी रॅली चे सुंदर नियोजन केले.
रॅलीचा देशभक्तीचा संदेश केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याचा अभिमान व राष्ट्रीय एकतेची जाणीव अधिक दृढ करून गेला.