रत्नागिरी : जिजाऊ ग्रुप आणि पूजा पवार महिला मंडळ यांच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने २७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
साळवी स्टॉप येथील वंदनीय बाळासाहेब ठाकरे ऍक्टिव्हिटी सेंटर येथे हा समारंभ होईल. शिवसेना महिला शहर संघटक सौ. पूजा दीपक पवार यांच्या पुढाकाराने या समारंभाचे आयोजन करण्यात आले असून, जास्तीत जास्त महिलांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिजाऊ ग्रुप आणि पूजा पवार महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.