रत्नागिरी : श्री प्रतिष्ठान व नामदार डॉ उदय सामंत पुरस्कृत मंडळातर्फे आयोजित मांडवी येथील दहिहंडी उत्सवाचे उद्घाटन उद्योजक विजय खेडेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. दरवर्षी मांडवी येथे श्री प्रतिष्ठानतर्फे दहिहंडी उत्सव आयोजित करण्यात येतो. मांडवी किनाऱ्यावरील वाळूवर मानवी मनोरे रचताना गोविंदा पथकाना कसरत करावी लागते. सर्वात उंच थर लावणाऱ्या मंडळाला श्री प्रतिष्ठान व उदय सामंत पुरस्कृत मंडळातर्फे रोख रकमेचे पारितोषिक देण्यात येते. तसेच उद्घाटनानंतर श्री आदिष्टी कृपा शिरगाव या संघाने अवघ्या कमी सेकंदात मनोरा रचला. दहिहंडीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे.
यावेळी उद्योजक दीपक पवार, पूजा पवार, वैभवी खेडेकर, निमेश नायर, श्रध्दा हळदणकर, अभिजित गोडबोले, प्रवीण भातडे, बारक्या हळदणकर, योगिता खांडेकर, अमित कदम उपस्थित होते.






