Thursday, March 13, 2025

Latest Posts

श्रीदेव गणपतीपुळे संस्थानतर्फे गणेशोत्सव

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्रीदेव गणपतीपुळे संस्थानतर्फे माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३० जानेवारी ते दि. ४ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
यामध्ये गुरुवार, दि. ३० रोजी सकाळी ९:३० वाजता ‘श्रीं’ची महापूजा, सायंकाळी ४ वाजता गणेशयाग होणार आहे. दि. ३० जानेवारी ते दि. ४ फेब्रुवारी या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता सामुदायिक आरती व मंत्रपुष्प होणार आहे. शुक्रवार, दि. ३१ रोजी सकाळी ७ वाजता गणेशयाग पूर्णाहूती, दि. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता ‘श्रीं’ ची पालखी मिरवणूक, दि. २ रोजी सहस्त्र मोदक समर्पण सोहळा होणार आहे. उत्सवकाळात दररोज सायंकाळी ७:३० वाजता कीर्तनमाला आयोजित केली असून कीर्तनकार ह. भ. प. मोहनबुवा कुबेर (नागपूर) कीर्तन सादर करणार आहेत.
तसेच सोमवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजता ‘स्वरसंध्या’ हा गायनाचा कार्यक्रम आयोजित केला असून, कुणाल भिडे, वैष्णवी जोशी गायनाचे सादरीकरण करणार आहेत. मंगळवार, दि. ४ रोजी रात्री १० वाजता श्री गणेश प्रासादिक नाट्य मंडळातर्फे मोरूची मावशी नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांची जय्यत तयारी देवस्थानतर्फे करण्यात येत आहे.
भाविकांनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे सरपंच डाॅ. श्रीराम केळकर यांनी केले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.