Sunday, March 22, 2026

Latest Posts

सतीश शिवरकर यांची रायगड येथे पदोन्नतीने बदली

रत्नागिरी: पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांची पदोन्नती होउन रायगड पोलिस मुख्यालय येथे पोलिस उप अधिक्षकपदी बदली झाली आहे. सध्या सतीश शिवरकर हे रत्नागिरी येथील जिल्हा नियंत्रण कक्ष येथे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
    आठ महिन्यांपूर्वी पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांची पालघरहून रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. या काळात त्यांनी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यात तसेच मिरकरवाडा येथील अनधिकृत बांधकाम हटाव बंदोबस्त करताना चोख कामगिरी पार पाडली होती. 16 जुलै 2025 रोजी त्यांची शहर पोलिस निरीक्षक पदावरुन बदली होउन जिल्हा नियंत्रण कक्ष येथे पोलिस निरीक्षक म्हण्ाून नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तिला एक महिना पूर्ण होण्याअगादरच सतीश शिवरकर यांची पुन्हा बदली होउन त्यांची पदोन्नती होउन रायगड पोलिस मुख्यालय येथे पोलिस उप अधिक्षकपदी बदली झाली आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.