Tuesday, March 24, 2026

Latest Posts

सर्वसामान्य लोकांचा राज ठाकरेंवर विश्वास अनेक महिलांनी केला मनसे मध्ये जाहीर पक्ष प्रवेश

रत्नागिरी :  शहरातील अनेक महिलांनी राज ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर,उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, जिल्हा सचिव महेंद्र गुळेकर,शहर अध्यक्ष बाबय भाटकर मा. तालुकाध्यक्ष सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शन खाली महिला शहर सचिव संपदा राणा यांच्या नेतृत्वाखाली मनसे मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.
राज ठाकरे यांची मराठी बाबतीत असलेली भूमिका तसेच त्यांचे पदाधिकारी रत्नागिरी मध्ये करत असलेल्या लोकोपयोगी कामानी प्रेरित होऊन आपण आज मनसे चे सदस्यत्व स्वीकारले असल्याचे प्रवेश कर्त्यानी सांगितले.
आगामी काही दिवसांत अजून पक्ष प्रवेश होतील असे उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर यांनी सांगितले. यां प्रसंगी जिल्हा सचिव महेंद्र गुळेकर उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर मा. तालुकाध्यक्ष सचिन शिंदे शहर अध्यक्ष बाबय भाटकर महिला शहर अध्यक्षा सुश्मिता सुर्वे शहर सचिव संपदा राणा कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम इत्यादी उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.