Wednesday, March 25, 2026

Latest Posts

स्टाईल, कम्फर्ट आणि परफॉर्मन्सचा परफेक्ट कॉम्बो म्हणजेच टोरोफिट स्पोर्ट्स वेअर हे नवे दालन आजपासून रत्नागिरीकरांसाठी खुले

रत्नागिरी दि. २८ :- विविध प्रकारच्या स्पोर्ट्ससाठी अत्यंत आकर्षक पद्धतीचे टी-शर्ट्स, जिम वेअर व ट्रॅकसूट्स यासारखे स्पोर्ट्स वेअर रत्नागिरीकरांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याची सुविधा रत्नागिरीतील ओमकार सावंतदेसाई आणि शशिकांत पवार या दोन होतकरू तरुणांनी उपलब्ध करुन दिली आहे. स्टाईल, कम्फर्ट आणि परफॉर्मन्स यांचा परफेक्ट कॉम्बो म्हणजेच टोरोफिट स्पोर्ट्स वेअर! स्वा. सावरकर नाट्यगृहाच्या शेजारील नगर परिषदेच्या गाळ्यात हे फिटनेस आणि स्टाईलचे नवे दालन शुक्रवारी २८ नोव्हेंबर रोजी सुरू झाले आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक श्री. महेश सामंत आणि रत्नागिरीतील प्रतिथयश कर सल्लागार श्री. राजेश सोहनी यांच्या हस्ते टोरोफिट स्पोर्ट्स वेअर या नव्या दालनाचा शुभारंभ करण्यात आला.रत्नागिरीकरांसाठी स्पोर्ट्स जर्सी, प्रीमियम रनिंग टी-शर्ट्स, जिम वेअर व ट्रॅकसूट्स, स्पोर्ट्स शॉर्ट्स व लोअर्स, स्पोर्ट्स शूज, क्रिकेट, फुटबॉल, बास्के आदी किफायतशीर दरात टोरोफिट स्पोर्ट्स वेअर या नव्या दालनात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ओमकार सावंतदेसाई आणि शशिकांत पवार या रत्नागिरीतील तरुण होतकरू तरुणांनी या नव्या व्यवसायात पदार्पण केले असून, रत्नागिरीकरांना अत्यंत किफायतशीर दरात स्पोर्ट्स वेअर उपलब्ध करून देण्याची सुविधा निर्माण केली आहे. रत्नागिरीकरांनी या नव्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.