रत्नागिरी : ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार विनापरवाना लाऊड स्पीकर लावणाऱ्यांवर तसेच लाऊड स्पीकरचा मर्यादेपेक्षा अधिक आवाज ठेवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. गणेशोत्सव काळात याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकारद्वारे याबाबत अधिक माहिती दिली आहे. मुळात स्पीकर चा वापर परवानगी घेऊनच करणे अपेक्षित आहे. विनापरवाना स्पीकर आणि अधिक डेसीबलचा आवाज याबाबत कोठूनही तक्रार आली तर पोलिसांकडून ध्वनी मापक यंत्राद्वारे आवाजाची तीव्रता मोजली जाईल. नियमबाह्य आवाज नोंदवला गेला तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
क्षेत्रनिहाय “आवाज” ठरला
पोलिसांनी औद्योगिक, व्यावसायिक, निवासी आणि शांतता क्षेत्र असे चार भाग केले असून, त्यानुसार दिवस आणि रात्री साठी दोन्ही मर्दानी निश्चित केली आहे. त्यामध्ये मर्यादेपेक्षा अधिक आवाज असल्यास पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून स्वतंत्र कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी एक लाखापर्यंत दंड आणि पाच वर्षाचा शिक्षेची तरतूद आहे.