रत्नागिरी: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे रत्नागिरीत वास्तव्यास असताना शिरगाव येथील दामले यांच्या घरात राहत होते. त्यांनी ज्या खोलीत वास्तव्य केले होते, ती खोली दामले कुटुंबाने एक ऐतिहासिक खजिना म्हणून आजही जतन केली आहे. याच ऐतिहासिक खोलीला आज, २८ मे रोजी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी पोलीस अधीक्षक बगाटे यांनी दामले कुटुंबीयांशी संवाद साधला आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रत्नागिरी येथील वास्तव्याबद्दल तसेच या खोलीच्या ऐतिहासिक महत्त्वाविषयी चर्चा केली. दामले कुटुंबाने ही खोली कशी जपली आहे, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. सावरकरांच्या स्मृती जपण्याच्या या प्रयत्नाबद्दल पोलीस अधीक्षकांनी दामले कुटुंबाचे कौतुक केले. या भेटीमुळे रत्नागिरीच्या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.







