रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी घाटात सीएनजीने भरलेला कॅप्सूल कंटेनर मिनी बसवर धडकला. अपघाताची तीव्रता गंभीर होती. अशावेळी स्थानिक लोकांनी बसमधील जखमी प्रवाशांना ऍम्ब्युलन्स व खाजगी वाहनाने रत्नागिरी शासकीय रुग्णालयात हलविले. किमान एक तासाने ट्रॅफिक पोलिस यंत्रणा आली. त्यानंतर फायरबिग्रेड ग्रामीण पोलिस ठाणे यांना त्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांंनी दिली मात्र दीड तासाने पोलिस यंत्रणा आली, असे संजय सुरेश निवळकर जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा रत्नागिरी दक्षिण भाजपा यांनी लेखी पोलिस महानिरीक्षक यांना मेलने कळविले असून त्याच्या प्रती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि खासदार नारायण राणे यांना पाठविल्या आहेत.
जिल्हा पोलिस अधिक्षक साडेदहाला हजर झाले त्यापूर्वी जखमींना सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलिस पाटील यांनी जीव धोक्यात घालून रुग्णालयात पाठविले होते. मात्र उलट आम्हां ग्रामस्थांना जिल्हा पोलिस अधिक्षकांनी अपमानास्पद वागणूक दिली असून स्थानिक ग्रामस्थांची मने दुखावली आहेत, असे अनेक मुद्दे त्यांनी पत्रात नमूद केले आहेत. त्याच्या प्रती प्रसिद्धीसाठी प्रसारमाध्यमांकडे पाठविल्या आहेत.



