Saturday, February 14, 2026

Latest Posts

चिपळुणात मुख्य रस्ता रुंदीकरणाला हवेत १०४ कोटी

चिपळूण : चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी गुरुवारी दुपारी नगरपरिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना घेऊन बहादूरशेखनाका ते चिंचनाका या रस्त्याच्या मोजणी व मार्किंग कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या रस्त्याच्या विकासासाठी शासनाकडे १०४ कोटींच्या निधीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
शहरातील बहादूरशेखनाका ते चिंचनाका आणि चिंचनाका ते पाग पॉवर हाऊस दरम्यानचा रस्ता १५ मीटर रुंद केला जाणार आहे. गुरुवारी काविळतळीपर्यंत मोजणी करण्यात आली. शुक्रवारी दुपारी २:३० वाजता काविळतळी ते चिंचनाका या उर्वरित टप्प्याची मोजणी करून काम पूर्ण करण्यात आले. कागदोपत्री रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या व्यक्तींना नोटीस देऊन अतिक्रमण हटवण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. त्यानंतर नगरपरिषदेकडून धडक कारवाई केली जाईल, असे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी स्पष्ट केले.
या कारवाई मोहिमेत उपमुख्य अधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढांबकर, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रोहित खाडे, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर नगरसेवक कपिल शिर्के, गणेश आग्रे, शिंदेसेना उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण हेही उपस्थित होते.
बहादूरशेख नाका ते चिंचनाका हा रस्ता पूर्वी महामार्ग विभागाकडे होता. अलीकडेच हा रस्ता नगर परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे. रस्त्याचे रुंदीकरण होऊन वाहतुकीची कोंडी सुटावी, या उद्देशाने रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.