रविवारी भारतीय तटरक्षक दल व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्यात होणार सामंजस्य करार
पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती
रत्नागिरी । प्रतिनिधी
रत्नागिरी विमानतळावरील भारतीय तटरक्षक दल (ICG) व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) यांच्या समन्वयातून आयोजित करण्यात आलेल्या ‘सामंजस्य करारा’चा कार्यक्रम रविवार, ५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी येथील हॉटेल सावंत पॅलेस हॉल येथे होणार आहे. या करारामुळे रत्नागिरी विमानतळाच्या विकासाला आणि भविष्यातील विमान वाहतूक सुविधांच्या बळकटीकरणाला महत्त्वपूर्ण चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या कार्यक्रमाला उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई अनंत केद्रे, राज्यमंत्री योगेश कदम, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे, खासदार सुनील तटकरे, विधान परिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, अनिकेत तटकरे, निरंजन डावखरे, प्रमोद जठार, आमदार गोपाळ कदम, किरण सामंत, भास्कर जाधव, आयसीजीएस रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर कमांडंट कुणाल सी. नाईक, एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री. मंगेश कुलकर्णी यांनी केले असून, रत्नागिरीच्या विमानतळ विकासाच्या दृष्टीने हा सामंजस्य करार महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



