दोन महिने दररोज होणार पाणी पुरवठा : पाणी सभापती निमेश नायर
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा संदर्भात नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, मुख्याधिकारी वैभव गारवे तसेच पाणी सभापती निमेश नायर यांनी रत्नागिरीकरांसाठी खुशखबर दिली असून धरणात दोन महिने पुरेल आणि दररोज पाणी पुरवठा सुरू राहील इतका पाणी साठा आहे.
याबाबत बोलताना पाणी सभापती निमेष नायर म्हणाले
आज शीळ धरणाची पाहणी केली त्यानुसार आज १ एप्रिल २०२६ रोजी धरणांत १.६७९ दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे
हा पाणी साठी शहराला पुढील पुढील ७० दिवस पुरेल इतका आहे
शहराला दररोज २० mlt लागते
त्यामुळे एप्रिल आणि मे पर्यंत पुरेसे पाणी मिळणार आहे
योजना पूर्ण होऊन २ वर्ष झाले आहे त्यामुळे सर्व ठिकाणी पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत आहे
किरकोळ दुरुस्तीचे कामे तातडीने होत आहेत
बाष्पीभवनाने पाणी पुरवठ्यावर परिणाम होणे अपेक्षित असले तरीही याच अंदाजाने दोन महिने दररोज पाणी पुरवठा होणार आहे
१ महिन्यांनी पुन्हा पाणी साठ्याचा आढावा घेणार
रस्ते, cng यांची कामे आहेत त्यामुळे पाइप लाईन मधे बिघाड होऊ शकतो मात्र तातडीने दुरुस्ती होणार



