रत्नागिरी : शहरानजिकच्या साळवी स्टॉप परिसरातील कमी दाबाच्या पाण्याची समस्या आता लवकरच संपुष्टात येणार असून स्थानिक नगरसेविका पूजा पवार यांनी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे आणि पाणी सभापती निमेश नायर यांच्या माध्यमातून ही समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने पावलं उचलली आहेत.
साळवी स्टॉप परिसरातील नागरिकांना गेले काही दिवस कमी दाबाच्या पाण्याचा सामना करावा लागत होता. त्यामुळे त्यांच्याकडे पाण्याचा पुरेसा साठा होत नव्हता या समस्येची दखल स्थानिक नगरसेविका पूजा पवार यांनी घेतली. साळवी स्टॉप परिसरात सध्या महामार्गाचे काम वेगाने सुरू असताना त्यामुळेच या भागातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही चोकअप झाली होती. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध होत नव्हता याची दखल घेत पूजा पवार यांनी ही समस्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्याकडे मांडली त्यानंतर पाणी सभापती निमेश नायर यांनी या समस्येची तत्काळ दखल घेत घटनास्थळी भेट दिली आणि पाईपलाईन संबंधित कर्मचारी आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांसह पाहणी केली यानंतर संबंधितांना पाणी सभापती निमेश नायर यांनी योग्य त्या सूचना दिल्या असून लवकरच ही समस्या मार्गी लागणार आहे स्थानिक नगरसेविका पूजा पवार यांच्यामुळे आता साळवी स्टॉप परिसरातील नागरिकांना लवकरच मुबलक पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध होणार आहे त्यामुळे नागरिकांनी नगरसेवकांचे आभार व्यक्त केले आहेत.
फोटो कॅप्शन: साळवी स्टॉप येथील नवीन जलवाहिनीची पहाणी करताना पाणी सभापती निमेश नायर, स्थानिक नगरसेविका पूजा पवार आणि संबंधित कर्मचारी.



