Wednesday, September 9, 2026

Latest Posts

खेडमधील सात्विणगाव येथे ‘निसर्ग माहिती केंद्रा’चे शनिवारी पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी : महाराष्ट्र शासन वन विभाग आणि वनविभाग रत्नागिरी (चिपळूण) यांच्यावतीने जिल्हा नियोजन योजना २०२४-२५ अंतर्गत खेड तालुक्यातील सात्विणगाव येथे उभारण्यात आलेल्या ‘निसर्ग माहिती केंद्रा’चे उद्घाटन शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
    या सोहळ्याला राज्यमंत्री (गृह-शहरे, महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन) योगेश कदम तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता अनंत केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, आमदार सर्वश्री निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, अनिकेत तटकरे, प्रमोद जठार, शेखर निकम, भास्कर जाधव, किरण सामंत तसेच मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर श्री लक्ष्मी (भा.व.से.) उपस्थित राहणार आहेत.
   याशिवाय सन्माननीय अतिथी म्हणून  जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे उपस्थित राहणार आहेत.
   निसर्ग संवर्धन, पर्यावरण शिक्षण आणि स्थानिक जैवविविधतेची माहिती नागरिकांपर्यंत व पर्यटकांपर्यंत पोहोचावी यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. या सोहळ्यास निसर्गप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड व परिक्षेत्र वन अधिकारी (दापोली) राजेंद्र पाटील यांनी केले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.