रत्नागिरी: रत्नागिरी येथे अधिकमासानिमित्त आयोजित करण्यात आलेली ३०+३ सत्यनारायण महापूजा ही एक धार्मिक व सामूहिक भक्तीमय उपक्रम आहे. हिंदू धर्मात अधिकमास (पुरुषोत्तम मास) अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात भगवान विष्णूंची आराधना, जप, दानधर्म आणि सत्यनारायण पूजा केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे. शहरातील जुगाई मंदिरात आयोजित या पूजेत ३०+३ सत्यनारायण पूजा करण्यात आल्या. अनेक ठिकाणी अशा प्रकारे एकत्रित किंवा संकल्पपूर्वक ठराविक संख्येने सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जाते. सत्यनारायण पूजा ही भगवान विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाची उपासना असून सुख, समृद्धी आणि कुटुंबातील मंगल कार्यांसाठी केली जाते
या धार्मिक उपक्रमाचे आयोजन गिरीश जोशी यांनी केले होते. पूजेदरम्यान विधिवत पूजा, सत्यनारायण कथा, आरती आणि प्रसाद वितरण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून भगवान सत्यनारायणाचे दर्शन घेतले व पूजेत सहभाग नोंदविला.



