Tuesday, May 19, 2026

Latest Posts

प्रभाग क्र. 14 मधील सामाजिक कार्यकर्ते आशिष मोरे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

रत्नागिरी : आमदार प्रमोदजी जठार यांनी शत: प्रतिशत भाजपा करणार असल्याचे मागील दौऱ्यात सांगितले होते. आणि कार्यकर्त्यांना देखील तसा संकल्प देत कामाला लागण्याचे आवाहन केले होते. आज प्रभाग क्रमांक 14 मधील सामाजिक कार्यकर्ते आशिष मोरे यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये पक्षप्रवेश करण्यात आला. शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या प्रयत्नातून भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेमध्ये येण्याचा विचार मोरे यांनी निश्चित केला. आणि आज भाजप जिल्हा कार्यालय येथे प्रमोदजी जठार साहेब, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
             प्रमोदजी जठार साहेब आमदार झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मोठ्या प्रमाणात भाजपामध्ये काम करण्यासाठी अनेक जण इच्छा व्यक्त करीत आहेत. पुढील काळात भारतीय जनता पार्टी अधिक सक्षम होईल असा प्रयत्न पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून होत आहे. आशिष मोरे यांच्या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 14 मधील भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक मजबूत होणार आहे. यावेळी आ. प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, ओंकार फडके, दादा ढेकणे, संदीप सुर्वे यांच्यासह शेकडो भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.