Friday, April 24, 2026

Latest Posts

रनप च्या महिला बाल कल्याण समिती तर्फे आयोजित छंद वर्गाचे दिमाखदार उद्घाटन

रत्नागिरी नगर परिषद आणि महिला व बाल कल्याण समिती मार्फत छंद वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या नाट्यगृहात या छंद वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन महिला व बाल कल्याण समिती सभापती प्रिती सुर्वे, उपसभापती पूजा पवार, नगरसेविका श्रद्धा हळदणकर, मेधा कुलकर्णी, आफ्रिन होडेकर, रुक्सार खान, जागृती  पिलणकर, निवेदिता कळंबटे, फौजिया मुजावर  यांचा हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला कुंभार काम कागदकाम बागकाम व्यक्तिमत्व विकास असे विविध प्रकार या छंद वर्गात घेण्यात येणार आहे. ३०० तीनशे विद्यार्थ्यांनी या छंद वर्गात सहभाग घेतला आहे. छंद वर्ग  २४ एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत असणार आहे.

हे छंद वर्ग जे शिक्षक घेणार आहे भगवान मोटे मुख्याध्यापक दामले विद्यालय, संदीप कांबळे मुख्याध्यापक न. प. किल्ला शाळा, कागदकाम मार्गदर्शक दीप्तेश पाटील, अनन्या कीर, ओंकार लोध आणि अन्य मान्यवर उपस्थित होते

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.