रत्नागिरी: 14 एप्रिल 2026 रोजी ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ. राजवाडे मॅडम यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जयंतीनिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनाविषयी समूहगीत सादर केले. बाबासाहेबांचे जीवन उलगडून सांगणारे नृत्यही सादर झाले. विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी मराठीतून तसेच इंग्रजीतून भाषणे सादर केली. बालवाडीत शिकणारा कुमार प्रसेनजीत अक्षय मिसाळ याने ओघवत्या शैलीत आपले भाषण सादर केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ. औघडे मॅडम म्हणाल्या की ,”डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नसून ते संपूर्ण जगासाठी ज्ञानाचे प्रतीक आहेत.” विद्यार्थ्यां ना वाचनाची गोडी लागली पाहिजे .मेहनत ,चिकाटी, जिद्द आणि आत्मविश्वास यांनी कोणतीही गोष्ट अशक्य नसते असे मत मांडले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्राची आठवण करून देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सूर्यवंशी सरांनी केले. त्यांनी या कार्यक्रमात उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजवाडे मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.



