रत्नागिरी: रक्तदान हे जगातील सर्वात श्रेष्ठ दान आहे. आपल्या रक्ताचा एक थेंब एखाद्या कुटुंबाचा आनंद परत मिळवून देऊ शकतो. शिवसेना रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदानाचा पवित्र कार्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन रक्तदान करावे असे विनम्र आवाहन करण्यात आले आहे. रक्तदान हेच श्रेष्ठदान चला या महायज्ञात सामील होऊया. बुधवार दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शहरातील जयेश मंगल कार्यालय माळ नाका येथे आयोजन करण्यात आले आहे.



