रत्नागिरी : येथील पटवर्धन शाळेच्या इयत्ता आठवीच्या १३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले असून, यापैकी चार विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत झेप घेतली आहे. या विद्यार्थ्यांचे शाळेच्या संस्था पदाधिकाऱ्यांनी, मुख्याध्यापकांनी आणि पर्यवेक्षकांनी भरभरून कौतुक केले.
पटवर्धन शाळेने शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदाही इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवून शाळेची मान उंचावली आहे. एकूण १३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती पटकावली असून, त्यापैकी चार विद्यार्थी राज्यभरातील गुणवत्ता यादीत चमकले आहेत, ही शाळेसाठी आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
कुमारी फणसे नित्या संदीप राज्यात तिसरी ,कुमार दामले आदित्य महेश राज्यात सहावा, कुमार डोळ ललित अनंत राज्यात बारावा, कुमारी पाटील मधुरा संजय राज्यात सोळावा क्रमांक प्राप्त केला आहे .
तसेच कुमारी शेडेकर श्रावणी तेजस, कुमारी भाटकर सिद्धी शैलेश, कुमार साळुंखे स्वराज दीपक, कुमारी शेलार आदिती विनोद ,कुमारी काळे आश्लेषा रमेश ,कुमारी रायकर अंतरा अमेय, कुमारी सूर्यवंशी मैत्री महेश, कुमारी नाटेकर आर्ची सुदेश , कुमारी मयेकर यज्ञा वीरेंद्र, या विद्यार्थ्यांनीही शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती मिळवली आहे
या यशाबद्दल बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका घाटविलकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे, शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाचे आणि पालकांच्या सहकार्याचे कौतुक केले. संस्था पदाधिकारी श्री श्रीराम भावे, दादा वणजू, श्री नचिकेत जोशी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षिका श्रीमती शिरोळकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या यशामागे असलेल्या नियोजित अभ्यासाचे आणि सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले. पर्यवेक्षक श्री लवंदे सर व उपमुख्याध्यापक श्री पंगेरकर सर यांनीही मुलांचे कौतुक केले .आहे
या गुणवंत विद्यार्थ्यांमुळे पटवर्धन शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना मराठीसाठी श्री पालकर सर, श्रीमती केळकर मॅडम. गणितासाठी श्रीमती दामले मॅडम व श्रीमती बंडबे मॅडम श्री वावरे सर. इंग्रजीसाठी श्रीमती डोंगरे मॅडम बुद्धिमत्तेसाठी श्रीमती पिलणकर मॅडम या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.




