Sunday, March 22, 2026

Latest Posts

पोलिस कॉन्स्टेबल विक्रांत कदम यांची बॉम्ब शोध नाश पथक येथे बदली

रत्नागिरी: रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात पोलिस कॉन्स्टेबल विक्रांत कदम यांची रत्नागिरी बॉम्ब शोध नाश पथक याठिकाणी बदली झाली आहे. विक्रांत कदम हे गेली पाच वर्ष रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गोपनीय विभागात कार्यरत होते. यावेळी खूप महत्वाचे बंदोबस्त चांगली  कामगिरी केलेली आहे. तसेच मिरकर वाडा येथील अनधिकृत बांधकामांचा बंदोबस्ताचा वेळी सुद्धा  विक्रांत कदम यांनी चांगली कामगिरी केली आहे. सोमवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विक्रांत कदम यांचा निरोप समारंभ केला. यावेळी विक्रांत कदम बोलताना म्हणाले की शहर पोलीस ठाण्यात काम करताना खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या व विविध व्हीआयपी बंदोबस्त करण्याचे भाग्य लाभले. तसेच पोलीस स्थानकात  असलेल्या सर्व अंमलदार व अधिकाऱ्यांकडून खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या तसेच इथल्या पोलिस स्थानकाची नेहमीच आठवण येत राहील. या निरोप समारंभाला पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, राहुल पावसकर, दीपक साळवी मंदार रहाटे, अमित पालवे, अमोल भोसले,आशिष भालेकर, वैभव शिवलकर, विजय इदाते अन्य पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.