रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध मोबाईल शॉपी एस एस कम्युनिकेशनच्या दुसऱ्या शाखेला आज यशस्वीपणे आठ वर्षे पूर्ण झाली. या विशेष दिनानिमित्त उत्साहात केक कापून वाढदिवसाचा सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी सायबर शाखेच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, एस एस कम्युनिकेशनचे चॅनेल पार्टनर अमोल डोंगरे, मॅनेजर सुशांत वडगावे, रत्नागिरी खबरदारचे संपादक हेमंत वणजु, उद्योजक सौरभ मलूष्टे आणि गणेश धुरी, तुषार साळवी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरीतील सर्वात लोकप्रिय मोबाईल दुकानांपैकी एक असलेल्या एस एस कम्युनिकेशनने आपल्या ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. चॅनेल पार्टनर अमोल डोंगरे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून या व्यवसायाची सुरुवात केली आणि आज रत्नागिरीत एक मोठे नाव कमावले आहे. त्यांच्यावरच्या विश्वासामुळेच रत्नागिरीतील ग्राहक मोबाईल खरेदीसाठी सर्वप्रथम एस एस कम्युनिकेशनला पसंती देतात.
उत्तम आणि विश्वासपूर्ण सेवा देत, तसेच सर्वात कमी दरात मोबाईल आणि सर्व नामांकित कंपन्यांच्या मोबाईलची विस्तृत व्हरायटी उपलब्ध करून देत एस एस कम्युनिकेशनने रत्नागिरीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आठ वर्षे पूर्ण करून आता हे दुकान नवव्या वर्षात पदार्पण करत आहे. या यशाबद्दल शुभेच्छा देण्यासाठी आज मोठ्या संख्येने ग्राहकवर्ग आणि हितचिंतकांनी एस एस कम्युनिकेशनला भेट दिली.



