रत्नागिरी – जिल्ह्यात गेले तीन चार दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे नदी नाले तुडुंब वाहत आहेत. रत्नागिरी जवळील हरचेरी,चांदेराई परिसरामध्ये पुराचे पाणी भरले आहे. हरचेरी रस्त्यावरील वाहतूक सकाळी दहा वाजल्यापासून बंद आहे. नागरिकांनी सतर्क राहावे महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आल आहे.



