रत्नागिरी : तालुक्यातील वाटद खंडाळा येथील सायली देशी बारमधून गुरुवारी सकाळी भक्ती मयेकर हिचा मोबाईल हस्तगत करण्यात रत्नागिरी शहर पोलिसांना यश आले. या मोबाईलच्या डाटामधून आणखी काही माहिती हाती लागते का यासाठी प्रयत्न पोलीस करत आहेत. वाटद खंडाळा येथे भक्ती मयेकर हिला सायली देशी बारमध्ये वायरने गळा आवळून मारल्याचे उघडकीस आल्यानंतर अन्य दोन खुनाचा उलगडा शहर पोलिसांना करण्यात यश आले होते. त्याच ठिकाणी सिताराम वीर याला मारहाण केल्याचे शहर पोलिसांचा तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी दुर्वास पाटीलसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या पाहणी दरम्यान बार मधूनच मयत भक्ति मयेकरचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. भक्ती मयेकरचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागल्यामुळे या गुन्ह्यातील अनेक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता आहे. तिचे दूर्वांसोबत झालेले कॉल डिटेल्स चॅटिंग तसेच सिताराम वीर तिच्याशी फोनवर अश्लील बोलत असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने भक्ती मयेकर हिच्या मोबाईलचे सीडीआर तपासणार आहेत. या तपासून या गुन्ह्यातील अनेक गोष्टींवर प्रकाश पडण्यास मदत होणार आहे. अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.



