रत्नागिरी: आज दिनांक 17/102025 रोजी ग्रामपंचायत पोमेंडी बुद्रुक खेडशी नाका मध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मध्यमंडळ तालुका अध्यक्ष प्रतीक देसाई सहकाऱ्यांनी महालक्ष्मी नगर येथे महिलांसाठी मोफतआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराला बहुसंख्य महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. सदर शिबिरामध्ये दातांची तपासणी ,स्तन तपासणी आणि गर्भाशय तपासणी करून घेण्यात आली.सदर शिबिराचे नियोजन अनुष्का शेलार आणि सीमा पालेकर, वैभवी पालेकर, नम्रता इंगावले यांनी केले होते.बूथ अध्यक्ष जगदीश पालेकर यांनी आपल्या दुकानाचा एक गाळा येणाऱ्या महिला भगिनींना बसण्यासाठी उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे आभार. व त्यांच्या सहकार्याने या शिबिराला मदत झाली. शिबिराचे उद्घाटन सीमा जगदीश पालेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराला प्रमुख उपस्थिती नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष सुचिता नाचणकर, जिल्हा सरचिटणीस नुपुरा मुळ्ये, जिल्हा सचिव अनुश्री आपटे उपस्थित होत्या.



