रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुतीतर्फे प्रभाग क्रमांक पाच ब मधून सौ. पूजा दीपक पवार यांनी अर्ज दाखल केला आहे.सौ. पूजा दीपक पवार या प्रभाग क्रमांक पाच मध्ये गेली चार वर्षे कार्यरत असून त्यांनी मा. ना. उदयजी सामंत, आमदार किरण सामंत आणि रत्नागिरी नगर परिषदेच्या माध्यमातून तसेच स्वखर्चाने अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक पाच मधून पूजा पवार यांनाच उमेदवारी मिळावी अशी प्रभागातील नागरिकांची इच्छा होती. त्यानुसार पूजा पवार यांनी आज महायुती तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना शहर प्रमुख बिपिनजी बंदरकर आणि माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी उपस्थित होते. पूजा पवार यांना उमेदवारी मिळाल्यामुळे प्रभाग क्रमांक पाच मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.



