Wednesday, March 25, 2026

Latest Posts

गुरुवर्य एम. एन. जोशी इग्लिश मिडियमचे मॉडेल तालुकास्तरावर प्रथम

रत्नागिरी : शिक्षण विभाग पंचायत समिती रत्नागिरी आणि सर्वंकष विद्यामंदिर रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वंकष विद्या मंदिर कसोप येथे आयोजित ५३व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरुवर्य एम. एन. जोशी इंग्लिश मीडियम स्कूलच्या गार्डियन एक्स स्मार्ट सिस्टम या मॉडेलने ६ वी ते ८ वीच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला.
शाळेतील सातवीतील स्वर संजय सुवरे, मिहीर प्रशांत माचकर आणि अभिराज अनंत जाधव यांनी तंत्रज्ञानाचा सुरक्षिततेसाठी वापर करणारे गार्डन एक्स मार्ट सिस्टीम या मॉडेल चे सादरीकरण केले होते. विद्यार्थ्यांनी कल्पकतेने आणि नाविन्यपूर्णतेने तयार केलेली ही सिस्टीम परीक्षकांच्या पसंतीस उतरली. या विद्यार्थ्यांना शाळेतील विज्ञान विषय शिक्षक अनिकेत भोळे यांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांचे यशाबद्दल त्यांचे शाळेचे मुख्याध्यापक अमोल गावडे आणि संस्थापदेधिकारी यांनी अभिनंदन केले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.