रत्नागिरी बसणी येथे युवासेना व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे आज सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचा युवासेना जिल्हाप्रमुख श्री.प्रसाद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सिंधुरत्न परीक्षेत बसणी जिल्हापरिषद मराठी शाळेचा 100% निकाल लागल्यामुळे युवासेना स्थानिक प्रतिनिधि आराध्य महेश नेवरेकर यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वेदिका वैद्य व शिक्षिका सौ. वर्षा घाग यांचे विशेष अभिनंदन केले.ग्रामीण भागातल्या शाळेमधील विद्यार्थ्यांच्या यशामध्ये त्यांचे पालक व शिक्षक यांचा मोलाचा वाटत असतो आणी राज्यस्तरावर घेण्यात येणाऱ्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत गुणवत्ता यादीत यश मिळवणे ही खरंच कौतुकास्पद गोष्ट असल्याचे युवासेना रत्नागिरी जिल्हाप्रमुख श्री. प्रसाद सावंत यांनी सांगितले.यावेळी कुमारी सानवी सचिन गावडे,कुमारी गौरी सचिन नेवरेकर,कु.वरद वैभव रावणंग,कु.आराध्य मंदार झगडे,कुमारी दुर्वा सुमित राणे,कु. शिवम अभिजित झगडे,कु.आर्यन विजय मोहिते,कुमारी सृष्टी संतोष चव्हाण व इतर सर्व विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक श्री.मोहन(दादा) धांगडे,उपविभाग प्रमुख श्री.अमित धांगडे, उपसरपंच श्री.किशोर नेवरेकर, शाखाप्रमुख श्री.महेश नेवरेकर, कार्यालय प्रमुख श्री.संतोष नेवरेकर, गटप्रमुख श्री. अमेय मांडवकर, श्री.वैभव रावणंग व इतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.



