रत्नागिरी : शहरातील मारुती आळी येथील श्री मारुती मंदिर संस्थेच्या वतीने ३१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत श्री हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन केले असून, यानिमित विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
३१ मार्च रोजी सकाळी ९ वा. हनुमान याग होईल. १ एप्रिल रोजी श्रींचा वाढदिवसानिमित्त सकाळी पूजाअर्चा, लघुरुद्र, अभिषेक होईल. सायंकाळी ५ वा. ह.भ.प. लक्ष्मीप्रसाद कुलकर्णी (पटवारी) बीड, यांचे कीर्तन होईल. ७.३० वा. “भक्ती संध्या” हा ओमकार संसारे यांचा सुश्राव्य भक्ती गीतांचा कार्यक्रम होईल. त्यानंतर ९ वा. भोवत्या होतील.
२ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा पार पडेल. पहाटे ५ वा. ह.भ.प. लक्ष्मीप्रसाद कुलकर्णी (पटवारी) बीड, यांचे कीर्तन
श्रींच्या जन्मोत्सवाचे कीर्तन होईल. सकाळी ६ वा. ३९ मि. श्रींचा जन्मकाळ, सकाळी १० ते १२ वा. श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळाचे (केळये) बुवा उदय मेस्त्री यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. दुपारी छप्पन्न भोग नैवेद्य दाखवला जाईल. सायंकाळी ५ वा. श्रींची भव्यदिव्य रथोत्सव मिरवणूक, ६ वा. श्री भैरव प्रा. भजन मंडळ (कै. शंकरराव मयेकर), मुरुगवाडा यांच्या वतीने बुवा अजय पिलणकर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री १० वा. मिरवणुकीचे मंदिरात आगमन, भोवत्या व आरती होईल.
३ एप्रिल रोजी दुपारी १२ ते ३ यावेळेत महाप्रसादाचे वाटप केले जाईल. रात्री ८ वा. भोवत्या होतील. १०वा. ह.भ.प. लक्ष्मीप्रसाद कुलकर्णी यांचे लळीताचे कीर्तन होईल.
४ एप्रिल रोजी सकाळी उत्सव सांगता लघुरुद्राने होईल.
श्री मारुती मंदिर संस्थेतर्फे आयोजित या कार्यक्रमांचा भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष यांनी केले आहे.



