विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन
प्लास्टिक मुक्ती, नवीन वास्तूमध्ये सुरू होणार पालिकेचा कारभार
रत्नागिरी : नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांची पत्रकार परिषद
रत्नागिरी नगर परिषदेला १५० वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्ताने बोलताना नगरध्यक्षा म्हणाल्या
१ एप्रिल १८७६ ला नगर परिषदेची ब्रिटिशांनी केली स्थापना
ज शं केळकर हे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष
आम्ही निवडून आलेले ३२ जण भाग्यवान की १५० वर्षे पूर्ण होण्याचा आनंदोत्सव साजरा करण्याचे भाग्य आम्हाला
एका दिवसात हा उत्सव साजरा न करता वर्षभर विविध कार्यक्रम
एक विशेष सप्ताह साजरा होणार
रत्नागिरीला सांस्कृतिक वारसा, तेही साजरे केले जाणार
वर्षभरात सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम, विविध विकास कामे, वृक्षारोपण, महिला मुलांसाठी केले जाणार कार्यक्रम
गेल्या २ वर्षात शहराची प्रगती झाली पालकमंत्री उदय सामंत यांनी अनेक योजना राबविल्या कार्यक्रम केले
शिवसृष्टी लेसर शो सह अनेक पर्यटन विकासासाठी उपक्रम
पालकमंत्री उदय सामंत यांच्यामुळे रत्नागिरी शहर स्मार्ट शहर होत आहे
येत्या ५ वर्षात एक सुंदर रत्नागिरी पाहायला मिळणार आहे
यावेळी या पत्रकार परिषदेसाठी उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेवक बाळू साळवी, सौरभ मलुष्टे, राजू किर, अमित विलणकर, बंटी किर, गणेश भारती, सौ. प्रीती सुर्वे व अन्य महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.



