रत्नागिरी: नगर परिषदेची आज सकाळी ११ वाजता अत्यंत महत्त्वाची सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. सभेत शहराचा भविष्याची निगडित ११ महत्त्वाचा विषयांवर चर्चा आणि मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटनासाठी होणाऱ्या खर्चाला सभेत मंजूर देण्यात येणार आहे. तसेच नवीन सभागृहाचा नामकरणबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळ्याच्या तयारीवर या सभेत शिक्कामोर्तब होणार आहे. शहराच्या पायाभूत सुविधांवरही सभेत विशेष भर दिला जाणार आहे. आरडीएसएस एनसीआरएएमपी प्रकल्पांतर्गत भूमिगत वीजवाहिन्यांसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांचा पुनरास्थापना शुल्काबाबत आलेल्या कार्यालयीन अहवालावर गंभीर चर्चा होणार आहे तसेच पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्रमांक १ मधील नदीपात्रातील गाळ काढणे आणि प्रभाग क्रमांक ९ मध्ये वाल्मिकी ऋषी मेहता समाजासाठी हक्काची घरे व समाज भवन उभारण्याबाबतचा प्रस्तावावर महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहे. नगर परिषदेच्या ताब्यात नवीन वाहने सामील करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळवणे विविध विकास कामांचा अंदाजपत्रकाला मंजुरी देणे आणि नवीन निविदांवर निर्णय घेणे यासारखे प्रशासकीय विषयी अजेंडावर आहेत.
शहरातील कचऱ्या गाड्यांचा प्रश्न?
गेली कित्येक वर्ष शहरात कचरा गाड्या फिरत आहेत पण या कचरा गाड्यांची आता झालेली दुरवस्था पाहता नवीन कचरा गाड्या घेण्याबाबत काही निर्णय या सभेमध्ये होतो का याकडे आता देखील लक्ष लागले आहे?



