Sunday, May 3, 2026

Latest Posts

कलादालन आर्ट फेस्टिवलचे रत्नागिरीत आयोजन

रत्नागिरी :  रत्नागिरी शहरातील कलाकारांची कलाकारी आता एकाच ठिकाणी पाहता येणार आहे. त्यासाठी रत्नागिरी शहरातील कलाकारांनी एकत्र येत आर्ट फेस्टीवलचं आयोजन केलंय. यामध्ये विविध चित्र, कलाकारांनी तयार केलेल्या विविध वस्तु, रेक्झिन आर्टपासून तयार केलेल्या वस्तु देखील याठिकाणी पाहण्यासाठी आणि विक्रीसाठी उपलब्ध आहेत. स्थानिकांचा देखील त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. विविध वस्तु आणि चित्र देखील इथं खरेदी केली जात आहेत. रत्नागिरी शहरामध्ये कलाकारांनी एकत्र येत आर्ट फेस्टीवर भरवण्याचा केलेला हा पहिलाच प्रयत्न आहे. कोकणात येणाऱ्या पर्यटकांना देखील एक चांगली पर्वणी उपलब्ध झालीय. रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात कलादालन आर्ट फेस्टिवल या दालनाचा उद्घाटन प्रसंगी दीप प्रज्वलन करताना महिला व बाल कल्याण उपसभापती पूजा पवार, सभापती प्रीती सुर्वे, नगरसेविका मेधा कुलकर्णी, हेरंब जोगळेकर, विष्णू परीट, मुळ्ये, कलादालन चे प्रमुख यशोदीप कयाळ आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. आज दिवसभर हे प्रदर्शन सुरू राहणार आहे तरी नागरिकांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी यावे असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.