Wednesday, May 13, 2026

Latest Posts

जान्हवी मोरे स्मृती चषक कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते


रत्नागिरी : डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू स्व. जान्हवी सुनिल मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुला-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने मुला-मुलींच्या गटात विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर येथील १०० पेक्षा जास्त कॅरमपटू सहभागी झाले होते. दोन्ही गटांत प्रथम ८ क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूंना रोख रकमेची पारितोषिके, चषक, पदके देण्यात आली. एकूण १८ हजार रुपये रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. मुलांच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या सुसंस्कार हायस्कुलच्या ओमकार वडरने ठाण्याच्या आयइएस चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या प्रसाद मानेचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.