Wednesday, May 13, 2026

Latest Posts

सिंधुदुर्गात सादर होणार रत्नागिरीची लोककला ‘नमन ‘ नवलाईदेवी नमन मंडळ कुर्णे वरची पडयेवाडी लांजा करणार सादरीकरण

महाराष्ट्र शासनाच्या परिनिरीक्षण मंडळाची बैठक येत्या ७ मे रोजी कुणकेश्वर देवगड या ठिकाणी मंडळ अध्यक्ष विजय गोखले यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या अगोदरदेखील महाराष्ट्राच्या विविध भागात झालेल्या बैठकांमध्ये तिथली संस्कृती परंपरा विविध कलांच्या माध्यमातून दाखवली गेली. कोकणात ही दुसऱ्यांदा बैठक होत आहे. यापूर्वी कोकणात कणकवली येथे झालेल्या बैठकीत सिंधुदुर्गची लोककला दशावताराचे सादरीकरण केले गेले.मंडळाचे सदस्य संपूर्ण महाराष्ट्राच्या अनेक भागातून असल्याने या कोकणी लोककलेचा भुरळ सर्वांना पडली. आता पुन्हा एकदा कोकणात बैठक असल्याने यावेळी रत्नागिरी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली कोकणची लोककला नमन हिचे संध्याकाळी ७ वाजता सादरीकरण होणार आहे. नवलाईदेवी नमन मंडळ कुर्णे वरची पडयेवाडी तालुका लांजा याठिकाणचे नमन सादर होणार आहे. गण,गवळण,रावण नृत्य त्याचबरोबर राधा,कृष्ण,कंस शंकासुर त्याचबरोबर विविध पारंपरिक पात्रे पहायला मिळणार आहेत.यानिमित्ताने या कलेची झलक सर्व सदस्यांना पाहायला मिळणार आहे. या मंडळाचे प्रमुख सत्यविजय पडये असून याचे दिग्दर्शक प्रसिद्ध शाहीर गायक मोहन घडशी आहेत. याचे नियोजन रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ सदस्य राजेश गोसावी करत असून बैठक स्थळाचे एकूण नियोजन रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ सदस्य विजय चव्हाण करत आहेत.
     सर्व कलाकारांना अध्यक्ष विजय गोखले यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवले जाणार असून सभेला रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ सचिव संतोष खामकर, अधीक्षक दिलीप वाघमारेदेखील उपस्थित राहणार आहेत.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.