रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ च्या नगरसेविका तथा महिला व बालकल्याण उपसभापती सौ. पूजा दीपक पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सौ. पूजा पवार या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या असून, त्यांनी पहिल्याच प्रयत्नात रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ मधून नगरसेविका म्हणून विजय मिळवला. राज्याचे उद्योग मंत्री डॉ उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामकाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण उपसभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली.
गेल्या चार वर्षांपासून त्यांनी आपल्या प्रभागात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आलेले समर कॅम्प, विविध जनजागृती कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रम यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्या नेहमीच पुढाकार घेत असतात. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. तसेच गेल्या काही वर्षांपासून त्या प्रभागातील महिलांसाठी नवरात्री विशेष देवी दर्शन यात्रेचे आयोजन करत असून, या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
महिलांसाठी आयोजित करण्यात येणारा हळदी-कुंकू समारंभ हा त्यांच्या सामाजिक कार्याचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक वर्षांपासून त्या हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करत असून, त्यामुळे महिलांमध्ये सामाजिक एकोपा वाढण्यास मदत होत आहे.
महिला व बालकल्याण उपसभापतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरही त्यांनी विविध उपक्रम राबवून महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. तसेच प्रभागातील कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि इतर नागरी समस्यांबाबत नगर परिषदेमध्ये सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
सामाजिक बांधिलकी, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि नागरिकांप्रती असलेली तळमळ यामुळे सौ. पूजा दीपक पवार यांनी अल्पावधीतच एक कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹💐🎂
— वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
संकलन तन्मय दाते रत्नागिरी



