Friday, July 3, 2026

Latest Posts

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी सन्मान व पुरस्कार जिल्ह्यातील 6 जणांचा समावेश ; आनंद देसाई कृषिभूषण तर पत्रकार मेहरुन नाकाडे यांना शेतीमित्र

रत्नागिरी, दि. 3 (जिमाका) : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते कृषीदिनानिमित्त सन २०२३ व २०२४ या वर्षांमधील डॉ पंजाबराव देशमुख कृषिरत्न,  वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण यांसह विविध कृषी पुरस्कार वितरण व सन्मान सोहळा मुंबईत झाला. यात सन 2023 करिता 2 व सन 2024 करिता 4 असे जिल्ह्यातील 6 जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
   या पुरस्कार सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषीराज्य मंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सुरज मांढरे आदी या कृषी सन्मान सोहळ्याला उपस्थित होते.
*सन 2023 करिता*
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार* (पुरस्काराचे स्वरुप धनादेश रु. 1 लाख 20 हजार, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र) ठाणे विभागात डॉ. शैलेश सुभाषचंद्र शिंदेदेसाई, मु. पो. ओणी, ता. राजापूर. 
*वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार* (सर्वसाधारण गट) (पुरस्काराचे स्वरुप धनादेश रु. 44 हजार, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र) अनंत बाबाजी खांबे, मु. पो. मांडकी, ता.चिपळूण.

*सन 2024 करिता पुरस्कार*
*वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार* (पुरस्काराचे स्वरुप धनादेश रु. 2 लाख, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र) ठाणे विभागात आनंद जयंत देसाई मु. पो. पावस ता. रत्नागिरी.
*वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार* (पुरस्काराचे स्वरुप धनादेश रु. 1 लाख 20 हजार, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र) ठाणे विभागात मैरुन हमीद नाकाडे, मु. पो. नेवरे ता. रत्नागिरी
*उद्यान पंडित पुरस्कार* , (पुरस्काराचे स्वरुप धनादेश रु. 1 लाख, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र) ठाणे विभागात धनंजय श्रीकृष्ण केतकर, मु. पो. भिले, ता. चिपळूण. 
*वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार* (सर्वसाधारण गट)- (पुरस्काराचे स्वरुप धनादेश रु. 44 हजार, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र)  दयानंद बाबाजी चौगुले, मु.पो. खरवते – गावठाणवाडी, ता. राजापूर
000

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.