Thursday, July 16, 2026

Latest Posts

रत्नागिरीत नागरी संरक्षण दलाच्या ३६० प्रशिक्षणार्थींचा प्रमाणपत्र वितरण सोहळा गुरुवारी

रत्नागिरी, दि. १५ (जिमाका): केंद्रीय गृह मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये आणि नागरी संरक्षण दल, महाराष्ट्र राज्य (मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली, रत्नागिरी जिल्हा नियंत्रक तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली उपनियंत्रक, नागरी संरक्षण कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा उद्या, गुरुवार दिनांक १६ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.*
सन २०२५-२६ या वर्षात नागरी संरक्षण कार्यालयाने “ना. स. क्षमता बांधणी व विकास” (C.D. Capacity Building) या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील एकूण ३६० प्रशिक्षणार्थींना यशस्वीरित्या प्रशिक्षित केले आहे. या सर्व प्रशिक्षणार्थींना उद्या अधिकृतपणे प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.
हा वितरण सोहळा रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील, मध्यवर्ती प्रशासकीय ‘अ’ इमारत, दुसरा मजला येथील जिल्हा नियोजन सभागृहात सकाळी ११.०० ते दुपारी ०३.०० या वेळेत संपन्न होईल.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास नागरिकांनी तसेच संबंधित प्रशिक्षणार्थींनी उपस्थित राहावे, असे आवाहन नागरी संरक्षण दल, रत्नागिरीचे उपनियंत्रक ले. कर्नल प्रशांत आ. चतुर (नि.) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.