Tuesday, March 24, 2026

Latest Posts

13 ते 15 जून जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

रत्नागिरी:  प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार 13 ते 15 जून या कालावधीत जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.12 जून रोजी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून, 50 ते 60 किमी प्रति तास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.13 ते 15 जून या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली असून 13 जून रोजी काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व 50 ते 60 किमी प्रति तास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे
   हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in// या संकेतस्थळावरून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (02352) 222233 / 226248 किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 वर संपर्क करा. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्‍याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.*
   वीज चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी.  विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत.  दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा.  वीज चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे.  वीज चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. वीज चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे.   धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.  वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी ॲप’ डाऊनलोड करून घ्यावे.   पाऊस पडत असताना वीज चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये.  मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसात पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी.  मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा.  घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.  अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी रहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करु नका.  घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करुन घ्या.  पाऊस पडत असताना वीजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नका.  मोबाईलवर संभाषण करु नये. इलेक्ट्रिक वस्तूपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीचा आसरा घ्यावा.  मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा.  
जिल्हा आपती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी 02352- 226248 /222233. जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष 02352-222222. पोलीस टोल फ्री हेल्पलाईन 112.   जिल्हा रुग्णालय 02352-222363.   महावितरण, रत्नागिरी नियंत्रण कक्ष 7875765018.   तहसिल कार्यालय रत्नागिरी 02352-223127,  तहसिल कार्यालय लांजा 02351-230024,  तहसिल कार्यालय राजापूर 02353-222027,  तहसिल कार्यालय संगमेश्वर 02354-260024, तहसिल कार्यालय चिपळूण 02355-252044/9673252044, तहसिल कार्यालय खेड 02356- 263031, तहसिल कार्यालय दापोली 02358-282036,  तहसिल कार्यालय गुहागर 02359- 240237, तहसिल कार्यालय मंडणगड 02350-225236.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.