Tuesday, March 31, 2026

Latest Posts

बच्चू कडू यांचं उपोषण सोडवण्यात उदय सामंत ह्यांना यश

अमरावती : आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मा. बच्चू कडू यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील त्यांच्या अन्नत्याग उपोषणावर सकारात्मक चर्चा केली. त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस होता. 
    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडू यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली होती. तसेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील उपोषणस्थळी जाऊन संवाद साधला होता.
   शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुती सरकार सकारात्मक असून आज महायुती सरकारचा प्रतिनिधी म्हणून ही भेट घेण्यात आली. चर्चेनंतर बच्चू कडूंनी आपलं उपोषण मागे घेतलं. शासनाच्या वतीने एक अधिकृत पत्र त्यांना देण्यात आलं, ज्याचं वाचन देखील करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत महायुती सरकार संवेदनशील असून निर्णयक्षम आहे असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.

येत्या 15 दिवसांत एक उच्चस्तरीय समिती नेमली जाणार असून त्या समितीचा अहवाल आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थितांना दिले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.