Friday, April 17, 2026

Latest Posts

कुवारबाव येथे हिंदू संमेलनाची जय्यत तयारी सुरू

रत्नागिरी : शहराजवळील कुवारबाव, खेडशी, कारवांचीवाडी, मिरजोळे, गणेशनगर, साईनगर, पोमेंडी या परिसरातील हिंदूंचे विशाल संमेलन सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. याची जय्यत तयारी सुरू असून सर्व घरांमध्ये पत्रक देणे, मंदिर संस्थांच्या माध्यमातून आवाहन करणे असे उपक्रम राबवण्यात येत असून याला हिंदूंचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.

येत्या शनिवारी दि. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत कुवारबाव येथील श्री विठ्ठल मंदिर शेजारील महालक्ष्मी मंडळ पटांगण येथे हे संमेलन पार पडणार आहे. हिंदूंचे संघटन होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे या संमेलनाची आवश्यकता का आहे, याची माहिती देणारी पत्रके सर्व गावांतील हिंदूंच्या घरोघरी पोहोचवण्यात येत आहेत. याकरिता सकल हिंदू समाजातील स्वयंसेवक, गावचे कार्यकर्ते पोहोचत आहेत. या संमेलनाकरिता पाच ते सहा गावांतील हजारो बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा आयोजकांना विश्वास आहे.

संमेलनाच्या प्रसिद्धी, प्रचारासाठी १७ ला सायंकाळी ४.३० वाजता प्रचार फेरी काढण्यात येणार आहे. कुवारबाव येथील श्री विठ्ठल मंदिर येथून प्रचारफेरी सुरू होणार असून खेडशी, कारवांचीवाडी, मिरजोळे, गणेशनगर, साईनगर या भागातून जाणार आहे. संमेलनात हिंदुत्व, हिंदू समाजासमोरील सध्याची आव्हाने तसेच पंचपरिवर्तन या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. कुवारबाव, खेडशी, कारवांचीवाडी, मिरजोळे, गणेशनगर, साईनगर, पोमेंडी या परिसरातील हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संमेलन यशस्वी करावे, असे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.