Wednesday, May 13, 2026

Latest Posts

रत्नागिरी, दि. 7 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. 1 अंतर्गत नगरपरिषद रत्नागिरी हद्दीमध्ये रत्नागिरी मंडळ अंतर्गत उद्या 8 मे रोजी जयेश मंगल कार्यालय, थिबा पॅलेस रोड येथे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्वसामान्य जनता, महिला, विद्यार्थ्यांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी केले आहे.*
     शिबिरामध्ये विविध कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा, योजना तसेच लाभार्थ्यांना देण्यात येणारी योजना प्रमाणपत्रे, आभा कार्ड, विविध दाखले वाटप करण्यात येणार आहे. महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे  महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर अशा शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.