Saturday, April 18, 2026

Latest Posts

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रत्नागिरी शहरातील वाहतुकीत बदल

रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी १४ एप्रिल रोजी शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर मोठ्या संख्येने अनुयायांची उपस्थिती आणि होणारे कार्यक्रम या अनुषंगाने या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३४ व मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५, ११६(१) (अ) (ब) अन्वये याठिकाणी वाहतूक काही कालावधीसाठी बंद करण्यात येणार असून त्याऐवजी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

बौद्धजन पंचायत समिती तसेच इतर सहकारी संघटनांच्या वतीने १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी अनुयायी जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर एकत्र जमणार आहेत. यानिमित्त  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे अनुषंगाने सकाळी ८ ते रात्री १० यावेळेत डॉ. आंबेडकरांना मानवंदना कार्यक्रम त्यानंतर मिरवणुक, धम्म गिते, व्याख्याने असा कार्यक्रम होणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायांची गर्दी होण्याची शक्यता असून अशा वेळी पार्किंगचा प्रश्न निर्माण होवू शकतो अगर वाहतुक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३४ व मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५, ११६(१) (अ) (ब) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करत १४ एप्रिल रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत या ठिकाणची वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्याचे आदेश दिले आहेत.

जेलनाका-जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हील हॉस्पिट) ते जयस्तंभ (डावी बाजू) अशी वाहतूक बंद राहणार असून, त्याला जेलनाका-जीजीपीएस-गीताभवन-जयस्तंभ असा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. वाहनचालकांनी याची नोंद घेऊन १४ एप्रिल रोजी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, आहे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, शासकीय व मंत्री यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पोलीसांनी परवानगी दिलेले वाहने यांना लागू होणार नाही. निकडीच्या व अत्यावश्यक प्रसंगी त्याठिकाणी तैनात असलेले संबंधित पोलीस अधिकारी हे निर्णय घेवू शकतील.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.