Friday, April 24, 2026

Latest Posts

विद्यार्थिनींचा वेदनादायी काळ आनंददायी करणारा फुलराणी कक्ष – सौ. शिल्पा सुर्वे


रत्नागिरी : फाटक हायस्कूल येथे जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग आणि अनुसया महिला स्वयंसेवी संस्थेच्या समन्वयाने आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या संकल्पनेतून जिल्हा वार्षिक नियोजन योजनेअंतर्गत सर्व समावेशक आरोग्यदायी मासिक पाळी व्यवस्थापन करणाऱ्या नाविन्यपूर्ण फुलराणी कक्षाचे उद्घाटन रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ.शिल्पा सुर्वे यांच्या शुभहस्ते झाले.
        याप्रसंगी शिक्षण सभापती मा. नंदकुमार मुरकर माध्यमिकचे शिक्षणाधिकारी श्री. दीपक मेंगाणे, उपशिक्षणाधिकारी श्री.संदेश कडव, अनुसया महिला स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्षां नीलम पालव, सल्लागार अॅड शबाना वस्ता,  दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा दाक्षायणी बोपर्डीकर, डॉ.अनुराधा लेले, डॉ. शुभांगी बेडेकर, फाटकचे मुख्याध्यापक राजन कीर आदी मान्यवरांसह अनुसया संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
      फुलराणी कक्षाच्या उद्घाटनाच्या प्रास्ताविकातून नीलम पालव यांनी विद्यार्थिनी आणि माता पालक यांना मुलींच्या समस्या व मासिक पाळीच्या दरम्यान घ्यायची काळजी  याबाबत मार्गदर्शन केले. समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक असल्याचे मत शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी मांडले.  विद्यार्थिनींनी फुलराणी कक्षातील सुविधांचा योग्य प्रकारे वापर करावा असे प्रमुख पाहुण्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे सांगितले. अॅड शबाना वस्ता यांनी या उपक्रमाचे आणि फुलराणी कक्षातील सोयीसुविधांचे कौतुक केले.   अध्यक्षीय मनोगतातून  दाक्षायणी बोपर्डीकर यांनी कक्षातील स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.
उपस्थितांचे आभार  सौ. शिल्परेखा जोशी यांनी, तर सूत्रसंचालन सौ. वृषाली दळी यांनी केले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.