Saturday, July 25, 2026

Latest Posts

उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर

रत्नागिरी, दि. 25 (जिमाका) : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहे.*
रविवार २६ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता श्री. पतितपावन मंदिर संस्था रत्नागिरी शताब्दी महोत्सवासंदर्भातील कामांबाबत बैठक ( स्थळ: पाली कार्यालय, पाली, ता. जि. रत्नागिरी). सकाळी ११ वाजता मतदारसंघातील एस. टी. महामंडळ विभागाअंतर्गत अडीअडचणींबाबत बैठक (स्थळ: पाली कार्यालय, पाली). दुपारी  १२ वाजता रिक्षा व स्कूल बसेसच्या अडीअडचणींबाबत बैठक (स्थळ: पाली कार्यालय, पाली). दुपारी  १ वाजता येलोंदेवाडी लघू पाटबंधारे प्रकल्प तालुका चिपळूण धरणाच्या बुडीत क्षेत्राबाहेरील शिरवली व देवखेरकी येथील बांधकामाच्या संपादनाबाबत पूर्ण जिल्हा बैठक (स्थळ: पाली कार्यालय, पाली). दुपारी २ वाजता नियोजित रोप वे संदर्भातील आढावा बैठक (स्थळ: पाली कार्यालय, पाली). दुपारी ३ वाजता वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ: जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान, श्रीक्षेत्र नाणीज,  रत्नागिरी). सायंकाळी ४.३० वाजता ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव येथे सदिच्छा भेट (स्थळ: शिरगाव ग्रामपंचायत, ). सायंकाळी ६ वाजता रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघ जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य चर्चा(स्थळ: शासकीय विश्रामगृह रत्नागिरी). सायंकाळी ८ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय आढावा बैठक (स्थळ: अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचे कार्यालय). रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे राखीव.

सोमवार दि. २७ जुलै रोजी सकाळी  ११ वाजता सिंधुरत्न समृध्दी योजना कार्यकारी समितीची बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय,). दुपारी १२ वाजता मराठी भाषा आढावा बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय). दुपारी १.३० वाजता रत्नागिरी येथे हस्तकला केंद्र सुरू करण्याबाबत बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय). दुपारी २.१५ वाजता खादी व ग्रामोद्योग विभाग आढावा बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय). दुपारी ३ वाजता रत्नागिरी जिल्हा मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम आढावा बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय).  दुपारी ४ वाजता रत्नागिरी नगरपरिषद विकास कामांचा आढावा (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय).  सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय). सायंकाळी ६ वाजता राजिवडा बंधारा व भाट्ये बंदर परिसरातील विकासकामांची पाहणी.  रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे राखीव.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.